Man Dragged On Minibus Bonnet : दिल्लीत बस चालकाने एकाला ३ किलोमीटर बोनेटवर बसवून फिरवले

File Photo
File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोएडातील एका व्यक्तीला रविवारी (दि.१७) रात्री दिल्लीतील लाजपत नगर आणि डीएनडी फ्लायवे दरम्यान ३ किलोमीटरहून अधिक मिनीबसच्या बोनेटवर बसवून फिरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तो सुखरूप बचावला. याप्रकरणी मीनीबसचा चालक मनोज कुमार (वय ३०, मूळचा बिहार) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दिल्लीतील कोटला मुबारकपूर भागातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साऊथ-एक्स फ्लायओव्हरवरून जात असताना बस आणि ट्रक एकमेकांवर आदळल्याने ही घटना घडली. कुमार याच्या मिनीबसने एका ट्रकला धडक दिली. त्यानंतर ट्रकचालकाने मिनीबस थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुमार याने बस थांबवली नसल्याने ट्रकचालक मिनीबसच्या बोनेटवर चढला. पोलिस अधिकारी चंदन चौधरी म्हणाले की, "त्यांना रात्री साडेअकराच्या सुमारास ट्रक चालकाचा फोन आला, ज्यामध्ये त्याने लाजपत नगरमध्ये एका मिनीबसने त्याच्या वाहनाला धडक दिली असल्याचे सांगितले. या घटनेच्या व्हिडिओ फुटेजमध्ये तो माणूस चालत्या बसच्या बोनेटवर उभा होता आणि बराच अंतरापर्यंत त्याला तसेच नेल्याचे दिसत आहे. तो माणूस नंतर बोनेटवरून उडी मारताना दिसतो."

याबाबत मिनीबसचालकाने सांगितले की, "मी माझ्या ट्रकमधून प्रवास करत असताना मिनीबसने पाठीमागून धडक दिली. यानंतर मी मिनीबस थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने बसचे दरवाजे लॉक केल्याने बोनेटवर चढून बस थांबवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news