Parliament Attack : ‘या’ दहा देशांच्या संसदेवरही झाले होते हल्ले

Parliament Attack : ‘या’ दहा देशांच्या संसदेवरही झाले होते हल्ले
Published on
Updated on

नवी दिल्ली : लोकसभेत बुधवारी तरुणांनी केलेल्या घुसखोरीच्या घटनेने मोठा गोंधळ उडाला. अर्थात, याआधी ब्रिटनसह अन्य दहा देशांच्या संसदेवरही याआधी हल्ले झाले होते. (Parliament Attack)

ब्रिटनमध्ये कार धडकवली

ब्रिटन ः 22 मार्च 2017 रोजी लंडनमधील वेस्टमिन्स्टर पॅलेस म्हणजेच ब्रिटिश संसदेबाहेर दहशतवादी हल्ला झाला होता. खालीद मसूद नावाच्या 53 वर्षीय व्यक्तीने आपल्या कारमधून फूटपाथ ओलांडून संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याची कार वेस्टमिन्स्टर ब्रिजवर धडकली. या हल्ल्यात पाचजणांचा मृत्यू झाला, तर सुमारे 50 जण जखमी झाले. (Parliament Attack)

श्रीलंकेत ग्रेनेड फेकले

श्रीलंका ः श्रीलंकेच्या संसदेवर 1987 मध्ये 18 ऑगस्ट रोजी ग्रेनेड हल्ला झाला होता. हल्लेखोराने संसद सदस्यांची बैठक असलेल्या खोलीत दोन ग्रेनेड फेकले होते. श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती ज्युलियस जयवर्धने आणि पंतप्रधान रणसिंघे प्रेमदासा ज्या टेबलावर बसले होते, त्यावरून ग्रेनेड उडाला होता. (Parliament Attack)

अमेरिकेत संसदेची तोडफोड

वॉशिंग्टन ः अमेरिकेतील 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला होता. यानंतर ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिलला घेराव घातला. कॅपिटल हिलमध्ये ट्रम्प समर्थकांनी तोडफोडीची कृत्ये केली होती. यामध्ये एका पोलिस अधिकार्‍यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता.

चेचेन संसदेवर हल्लाबोल

मॉस्को ः चेचेन रिपब्लिक ऑफ रशियाच्या संसदेवर दहशतवाद्यांनी 19 ऑक्टोबर 2017 रोजी ग्रोझनी येथे हल्ला केला होता. यामध्ये दोन पोलिस अधिकार्‍यांसह सहाजणांचा मृत्यू झाला होता. मात्र, सर्व हल्लेखोरांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले.

ब्राझीलमध्ये संसदेत जबरदस्तीने प्रवेश

ब्राझीलिया ः डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांच्या हजारो समर्थकांनी पोलिस बॅरिकेडस् तोडून संसद, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती भवनात प्रवेश केला. तोडफोडही केली. गोंधळ घालणार्‍या 400 जणांना पोलिसांनी अटक केली.

फिलिपाईन्सच्या संसदेत स्फोट

मनिला ः 13 नोव्हेंबर 2007 रोजी फिलिपाईन्स संसदेच्या आवारात घडवून आणलेल्या स्फोटात एका मुस्लिम खासदारासह 3 जणांचा मृत्यू झाला होता. मुस्लिम खासदार वहाब अकबर यांना मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला. वहाब हे मुस्लिम बंडखोर गटाचे सदस्य होते.

तुर्की संसदेबाहेर आत्मघाती हल्ला

अंकारा ः 1 ऑक्टोबर 2023 रोजी तुर्कीच्या संसदेबाहेर आत्मघातकी हल्ला झाला होता. दोन आत्मघाती हल्लेखोर संसदेच्या दिशेने निघाले होते. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. गोळीबारात एक हल्लेखोर ठार झाला.

ऑस्ट्रेलियात संसदेत आग

कॅनबेरा ः 30 डिसेंबर 2021 रोजी आदिवासी आंदोलकांनी ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथील जुन्या संसदेच्या इमारतीत आग लावली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. 32 वर्षीय आरोपी कोळसा घेऊन संसदेच्या दारात उभा होता. त्याने हा कोळसा खाली ठेवला आणि पेटवला.

न्यूझीलंडच्या संसदेत कुर्‍हाड

वेलिंग्टन ः 12 जानेवारी 2021 रोजी एका व्यक्तीने कुर्‍हाड घेऊन न्यूझीलंडच्या संसदेत प्रवेश केला. त्याने वेलिंग्टन येथे संसद भवनाच्या खिडक्या आणि दरवाजे तोडले. पोलिसांनी या 31 वर्षीय तरुणाला अटक केली होती.

दक्षिण आफ्रिकेच्या संसदेत अग्निकांड

केपटाऊन ः 2 जानेवारी 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील संसद भवनात अचानकपणे आग लागली. त्यामुळे संसदेचे छत कोसळले होते. याप्रकरणी पोलिसांनी घातपाताची शंका व्यक्त करून एका व्यक्तीला अटक केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news