Acid Attack : ३ मुले असलेल्या विवाहित प्रेयसीने फेकले ॲसिड, प्रियकर गंभीर जखमी

acid attack
acid attack

पुढारी ऑनलाईन डेस्क : आतापर्यंत समाजात आपण तरुणी ॲसिड ॲटॅकच्या बळी ठरल्याचे पाहिले आहे. पण, बिहारमधील वैशाली येथील अगदी उलट एक घटना समोर आलीय. ज्यामध्ये तरुणीनेच प्रियकरावर ॲसिड फेकले आहे. (Acid Attack) वैशाली जिल्ह्यातील पातेपूर थाना क्षेत्रातील सिमरवारा गावात ही घटना घडलीय. सोमवारी रात्री उशीरा प्रेयसीने प्रियकराला फोन करून बोलावून घेतले आणि त्याच्यावर ॲसिड फेकून तिथूप पलायन केले. यावेळी तिच्यासोबत दुसरा तरुणदेखील होता. (Acid Attack)

संबंधित बातम्या –

गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचे नाव धर्मेंद्र कुमार असे आहे. त्याला हाजीपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या चेहरा आणि डोळे गंभीर जखमी झाले आहेत.

धर्मेंद्र वाहन चालक आहे. तो बोलेरोतून एका वऱ्हाडाला घेऊन टेकनारी गावात गेला होता. तेथून रात्री उशीरा परत आल्यानंतर तो गाडी मलकाच्या घरी सोडून घरी जात होता. रस्त्यात असताना त्याला प्रेयसीचा कॉल आला. पीडित धर्मेंद्र यांचे वय २२ वर्षे आहे. तो पेशाने चालक आहे. मागील पाच महिन्यापासून त्याने आपल्या शेजारी राहणाऱ्या २४ वर्षाच्या सरीता नावाच्या महिलेशी ओळख वाढवली होती.

सरिता विवाहित आहे आणि तिला तीन मुले आहेत. मागील काही काळापासून ती आफल्या पतीपासून लांब राहत होती. सिमरवाडामध्ये ती आपल्या माहेरी राहायची. धर्मेंद्र अविवाहित होता आणि त्याच्या घरच्यांनी त्याचे लग्न ठरवले होते. १७ डिसेंबरला त्याचे लग्न होणार होते. १२ डिसेंबर रात्री सरिताने धर्मेंद्रला फोन करून बोलावून घेतले. त्यावेळी त्याच्यावर ॲसिड फेकण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news