Chhattisgarh CM : छत्तीसगड मुख्यमंत्रीपदी उद्या विष्णुदेव साय होणार शपथबद्ध | पुढारी

Chhattisgarh CM : छत्तीसगड मुख्यमंत्रीपदी उद्या विष्णुदेव साय होणार शपथबद्ध

पुढारी ऑनलाईन डेस्क : विष्णुदेव साय उद्या (दि.१३)  छत्तीसगड मुख्यमंत्री पदाची   शपथ घेणार आहेत. हा सोहळा राजधानी रायपूर येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, माजी उपमुख्यमंत्री टीएस सिंह देव आणि छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दीपक बैज यांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. (Chhattisgarh CM) तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला  उपस्थित राहणार आहेत.

Chhattisgarh CM : कोण आहेत विष्णुदेव साय?

२१ फेब्रुवारी १९६४ रोजी जन्‍म झालेले विष्णुदेव साय यांचे मूळ गाव छत्तीसगडमधील कुंकुरी भागातील कानसाबेलला नजीक बगिया हे आहे. राज्यात आदिवासी सामुराई समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. साय या समाजातील आहेत. १९८९ मध्ये त्यांनी बगिया गावातून ग्रामपंचायत सदस्‍य म्‍हणून म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९०  मध्ये ते सरपंचपदी बिनविरोध निवड आले होते. तापकरा विधानसभा मतदारसंघातून प्रथम आमदार झाले. छत्तीसगड स्‍वतंत्र राज्‍याची निर्मिती हाेण्‍यापूर्वी १९९० ते १९९८ या कालावधीत मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य राहिले. १९९९ मध्ये ते १३ व्या लोकसभेसाठी रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. २०२० मध्ये ते छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष झाले.

आदिवासी सामुराई समाजातील अजित जोगी यांच्यानंतर कोणीही छत्तीसगडचे मुख्यमंत्री होऊ शकले नाही. यानंतर ते खासदार आणि केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. एवढेच नाही तर साय यांची गणना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळच्या नेत्यांमध्ये केली जाते. तसेच ते रमण सिंह यांचेही निकटवर्तीय मानले जातात. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात (२०१४-२०१९) विष्णुदेव साय यांना केंद्रात मंत्री करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आरएसएसच्या पदाचा राजीनामा दिला. (Vishnu Deo Sai) २००९ आणि २०१४ मध्‍ये ते पुन्हा रायगडमधून खासदार झाले. २७ मे २०१४  ते २०१९ या काळात केंद्रीय पोलाद खाण, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद त्‍यांनी भूषवले. पक्षाने २ डिसेंबर २०२२ रोजी भाजप राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य झाले. भाजपने ८ जुलै २०२३ रोजी राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य म्‍हणून त्‍यांची नियुक्‍ती केली होती.

हेही वाचा 

Back to top button