Rajasthan New CM Update: राजस्थानमधील ‘या’ दिग्गज नेत्याची मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार | पुढारी

Rajasthan New CM Update: राजस्थानमधील 'या' दिग्गज नेत्याची मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमध्‍ये मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. या संदर्भात आज (दि.१२) जयपूरमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज घोषणा होणार आहे. दरम्यान,  राजस्थानातील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून भाजपच्‍या एका दिग्गज नेत्याने माघार घेतली आहे. (Rajasthan New CM Update)

Rajasthan New CM Update: ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही’

राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी यांनी ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही’, असे स्पष्टपणे सांगितले. सीपी जोशी यांच्या नावाचीही मुख्यमंत्री पदासाठी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी  “मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही’ म्हणत चर्चेला पूर्णविराम दिला आहे.   सीपी जोशी पुढे म्हणाले की, आज विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. पक्षाचे निरीक्षक आज (दि.१२) जयपूरमध्ये दाखल होणार आहेत. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचे चित्र स्पष्ट होईल.” (Rajasthan New CM Update)

मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ नावांची चर्चा

भाजपने छत्तीसगडमध्ये आदिवासी नेते साय तर मध्य प्रदेशमध्ये ओबीसी प्रवर्गातील यादव यांची मुख्‍यमंत्रीपदी वर्णी लावली आहे आता राजस्थानमध्ये खुल्‍या प्रवर्गातील मुख्यमंत्री हाेण्‍याची शक्‍यता राजकीय वर्तृळात व्‍यक्‍त केली जात आहे. राजस्थानात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासोबत  गजेंद्र सिंह शेखावत, दिया कुमारी, अश्विनी वैष्णव  यांची नावे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. (Rajasthan New CM Update)

हेही वाचा:

Back to top button