चीनपेक्षा भारतात सर्वाधिक प्रदूषित शहरे | पुढारी

चीनपेक्षा भारतात सर्वाधिक प्रदूषित शहरे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : हिवाळा सुरू झाला की भारतातील अनेक शहरांतील हवा प्रदूषण वाढते. सुमारे सहा वर्षांपूर्वी चीनमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरे होती. 2017 मध्ये खराब हवा गुणवत्ता मानांकनात चीनमधील 75 शहरांचा, तर भारतातील 17 शहरांचा समावेश होता. पण, सहा वर्षांनंतर ही परिस्थिती खूपच बदलली आहे.

2022 च्या यादीनुसार जगातील सर्वाधिक 100 प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 65 ,तर चीनमधील केवळ 16 शहरे आहेत. वाहन निर्मिती आणि कोळसा वीज प्रकल्पांची संख्या कमी केल्याने चीनमधील प्रदूषण कमी झाले असल्याचे समोर आले आहे. यंदाच्या जून महिन्यात जागतिक बँकेच्या प्रकाशित झालेल्या एक अहवालानुसार, वाढत असलेल्या सूक्ष्म कणांमुळे श्रमिकांची उत्पादक क्षमता कमी होत असल्याचे भारताच्या जीडीपीचे दरवर्षी 0.56 टक्के नुकसान होते. 9 नोव्हेंबर पूर्वीच्या तीस दिवसांत दिल्ली प्रदूषण बीजिंगपेक्षा 14 पट अधिक होते. गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार हवा प्रदूषणामुळे दरवर्षी भारतात 21 लाख लोकांचा मृत्यू होतो. ही संख्या 2019 मध्ये 16 लाख इतकी होती.

Back to top button