लग्नाच्या वरातीऐवजी अंत्ययात्रा; अपघातात वधू-वरासह पाच ठार | पुढारी

लग्नाच्या वरातीऐवजी अंत्ययात्रा; अपघातात वधू-वरासह पाच ठार

रायपूर; वृत्तसंस्था : छत्तीसगडमध्ये जांजगीर-चंपा जिल्ह्यातील पकरिया जंगल परिसरात झालेल्या वर्‍हाडाच्या गाडीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात वधू-वरासह पाचजण जागीच ठार झाले. रविवारी सकाळी हा भीषण अपघात झाला.

धक्कादायक बाब म्हणजे गाडीला धडक मारून आरोपी ट्रकचालकाने पळ काढला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. रामगड येथून वर्‍हाडी मंडळी लग्न करून कारने परतत असताना पकरिया जंगल परिसरात त्यांच्या कारला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.

आनंदाची जागा घेतली दुःखाने

या भीषण अपघाताची माहिती मिळताच वधू-वरांच्या कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. जिथे कालपर्यंत सनई-चौघडे वाजत होते, आता तिथे स्मशानशांतता पसरली आहे. बालोदा येथील शुभम
सोनी आणि शिवनारायण येथे राहणारी नेहा यांचा विवाह शनिवारी रात्री पार पडला. शुभम रविवारी सकाळी वधूला घेऊन कारने घरी परतत होता.

Back to top button