गुवाहाटी, वृत्तसंस्था : तामिळनाडून आयफोननिर्मितीचा प्रकल्प टाटा उभारणार असल्याची बातमी विरते न विरते तोच टाटा समूहाने आसाममध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून टाटा समूह आसामात 40 हजार कोटी रुपये गुंतवणार आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एका कार्यक्रमात टाटांच्या गुंतवणुकीची माहिती दिली. ते म्हणाले की, टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आसाममधील जागीरोड येथे सेमी कंडक्टर प्रकल्प उभारणीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. कंपनीची राज्य सरकारसोबत प्राथमिक बोलणी झाली असून अंतिम मान्यतेसाठी केंद्राकडे कंपनीचा प्रस्ताव सादर होणार आहे.