Income Tax Raid : अबब…’आयकर’ने जप्‍त केली तब्‍बल ५० कोटींची राेकड, नोटा मोजणारे मशीन पडले बंद | पुढारी

Income Tax Raid : अबब...'आयकर'ने जप्‍त केली तब्‍बल ५० कोटींची राेकड, नोटा मोजणारे मशीन पडले बंद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आयकर विभागाने (Income Tax Raid) ओडिशा आणि झारखंडमधील बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर छापा टाकला. या कारवाईत तब्‍बल ५० कोटींची रोकड जप्‍त करण्‍यात आली. विशेष म्‍हणजे या कारवाईत जप्‍त करण्‍यात आलेल्‍या नोटा इतक्‍या सलग काही तास मोजण्‍यात आला. त्‍यामुळे नोटा मोजणारे मशीनच बंद पडले, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

आयकर विभागाने आयकर विभागाने ओडिशा आणि झारखंडमधील बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर बेहिशेबी संपत्ती प्रकरणी छापा टाकला. ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूर आणि झारखंडच्या रांची, लोहरदगा येथे ही धडक कारवाई झाली.णि कंपनीच्या आवारातून तब्‍बल ५० कोटींहून अधिक रोकड जप्‍त करण्‍यात आली.

प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कालपर्यंत 50 कोटी रुपयांच्या नोटांची मोजणी पूर्ण झाली आहे, मात्र नोटांची संख्या एवढी जास्त आहे की मशिन्सने काम करणे बंद केले आहे. अद्‍याप शोध मोहिम सुरु आहे.

 

Back to top button