

देशातील युवकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढला आहे. हार्टअॅटॅकने अलीकडच्या काळात अनेक तरुणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. बुधवारी (दि. 6) सकाळी 9.30 मिनिटांनी देशातील 10 लाख लोकांना हृदयविकारापासून काळजी घेण्याबाबतचे चेक ऑफ रिस्पान्सचे (सीपीआर) प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जीवनशैलीतील बदलामुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे. अनियमित जेवण, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचे प्रमाण कमी आदी कारणांमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे.
तरुणांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. लठ्ठ मुलांमध्ये हा धोका सर्वाधिक असतो. रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह आदींमुळेही कार्डियाक हार्टअॅटॅकचे प्रमाण वाढत आहे.
घाम येणे
ठोक्यांची गती असामान्य
डाव्या छातीत वेदना होणे
श्वासोच्छ्वासात अडथळा
बेशुद्ध होणे
आनुवंशिक कारणामुळेही हृदयविकाराचा धोका संभवतो. कुटुंबातील व्यक्तीस त्रास असल्यास धोका वाढण्याची शक्यता असते.