Winter Session of Parliament | ‘तिसरी बार मोदी सरकार’ : भाजप खासदारांच्‍या घाेषणांनी सभागृह दणाणले | पुढारी

Winter Session of Parliament | 'तिसरी बार मोदी सरकार' : भाजप खासदारांच्‍या घाेषणांनी सभागृह दणाणले

पुढारी ऑनलाईन डेस्क: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज (दि.४) सुरूवात झाली. लाेकसभेत कामकाजास प्रारंभ हाेताच भाजप खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘ तिसरी बार मोदी सरकार’ या सत्ताधारी भाजप खासदारांच्‍या घाेषणेने सभागृह दणाणले. खासदारांनी तीन राज्यातील विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, सभागृहात गदारोळ झाल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. ( Winter Session of Parliament)

हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीच्या सत्रातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप खासदारांनी लोकसभेत “तिसरी बार मोदी सरकार” आणि “बार बार मोदी सरकार”चा नारा दिला. सत्ताधारी मोदी सरकारच्या सर्व खासदारांनी सभागृहात उभे राहत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. (Winter Session of Parliament)

 Winter Session of Parliament: चार राज्यातील निकाल  उत्साहवर्धक

कालच चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले आहेत. हे अतिशय उत्साहवर्धक निकाल आले आहे. देशातील सर्वसामान्य माणसाचे कल्याण आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी समर्पित असलेल्यांसाठी चार राज्यातील निवडणुक निकाल प्रोत्साहन देणारे असल्याचेही पीएम मोदी यांनी संसदेला संबोधित करताना म्हटले आहे. (Winter Session of Parliament)

तीन राज्यांमधील पराभवाचा राग सभागृहात काढू नका- PM मोदी

 लोकसभा ही जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आहे. हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न आणि समस्यांवर चर्चा व्हावी. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे. विरोधी पक्षांनी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग काढू नये, असा टोला आज (दि.४) पंतप्रधान नरेंद मोदी यांनी विरोधी पक्षांना लगावला. लोकसभेची सेमीफायनल मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभांचा निकाल काल हाती आला. आज संसदेच्‍या हिवाळी अधिवेशनापूर्वी माध्‍यमांशी बाेलताना पंतप्रधान नरेंद्र माेदी म्‍हणाले की, देशाने नकारात्मकता नाकारली आहे, त्यामुळे विरोधी पक्षाने सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाला सकारात्मकतेने सामोरे जावे, असे आवाहनही त्‍यांनी केले. (

…तर देशाची दिशा बदलेल- मोदींचा विरोधकांना सल्ला

यावेळी पीएम मोदी म्हणाले, सध्याच्या निवडणूक निकालांच्या आधारे म्हटले तर विरोधी पक्षात बसलेल्या मित्रांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या अधिवेशनात विरोधी पक्षाने पराभवाचा राग काढण्याचे नियोजन करण्याऐवजी या पराभवातून धडा घेत पुढे जावे. गेल्या ९ वर्षातील नकारात्मकतेचा कल सोडून सकारात्मकतेने या अधिवेशनात पुढे गेले तर देशाची दिशा बदलेल, असेही पीएम मोदी म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button