PM मोदींवर टीका करतच काँग्रेसने केले पराभवाचे ‘विश्‍लेषण’ | पुढारी

PM मोदींवर टीका करतच काँग्रेसने केले पराभवाचे 'विश्‍लेषण'

पुढारी ऑनलाईन डेस्क: पाच राज्यांपैकी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभेच्या निकालाचे चित्र आज (दि.३) स्पष्ट झाले आहे. या चार राज्यांपैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्‍ये भाजपने निर्णायक आघाडी घेतली आहे. या तिन्‍ही राज्‍यांमध्‍ये भाजपच्‍या सत्ता स्‍थापनेच्‍या हालचालीही सुरु झाल्‍या आहेत. राजस्‍थान आणि छत्तीसगड राज्‍यातील सत्ता काँग्रेसला गमवावी लागली आहे. दरम्यान, काँग्रेसने पीएम मोदी यांच्यावर टीका करतच तीन राज्यातील विधानसभा पराभवाचे ‘विश्‍लेषण’ केले आहे. (Legislative Assembly Election Result)

Legislative Assembly Election Result : PM मोदींचे ‘कॅमेरा प्रथम’ हेच तत्व

काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केली आहे. यामध्ये पीएम मोदी यांना ‘कॅमेरा प्रेमी’ असे म्हटले आहे. तसेच ‘कॅमेरा प्रथम’ हे मोदी यांचे तत्त्व आहे. या तत्वावर पीए मोदी यांचे काम होत राहील, अशी खोचक टीका काँग्रेसने केली आहे. (Legislative Assembly Election Result)

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक भाजप नेत्यांकडून भाजपने विकासाचा अजेंडा राबवल्याचे माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट करण्यात आले होते. तर काँग्रेसचा पीएम मोदी आणि भाजपवर टीका करण्याचा अजेंडा असल्याचे देखील भाजप नेत्यांनी म्हटले होते. पाचपैकी ३ राज्यातील पराभवानंतरही काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करूनच या तीन राज्यातील पराभवाचे ‘विश्‍लेषण’ केले आहे. (Legislative Assembly Election Result)

हेही वाचा :

Back to top button