पुढारी ऑनलाईन डेस्क : २०१४ मध्ये स्थापना झाल्यापासून भारत राष्ट्र समिती (BRS) चा बालेकिल्ला असलेला तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसला चारी मुंड्या चीत केलं आहे. के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचा विजय उंबरठ्यावर आहे. तेलंगणा काँग्रेसचे फायरब्रँड अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी यांच्या धोरणात्मक नेतृत्वाने काँग्रेस तेलंगणात ऐतिहासिक विजय मिळवत आहे.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेसने ६४ जागांवर आघाडी घेतली असून बीआरएस ४० जागांसह पिछाडीवर आहे. ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. निवडणूक लढविणाऱ्या २ हजार २९० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. (Telangana Election Result Live)
Telangana Election Result 2023, Live Updates :
TPCC अध्यक्ष ए रेवंत रेड्डी कोडंगलमधून विजयी
काँग्रेस ६७ जागांवर आघाडीवर, बीआरएस ३६, भाजप ८, एआयएमआयएम ३, इतर १
माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद अझरुद्दीन ज्युबली हिल्समध्ये बीआरएस उमेदवाराविरुद्ध कमी फरकाने आघाडीवर आहेत.
ECI ट्रेंडनुसार, काँग्रेस ४४, बीआरएस २४, आणि भाजप ३ जागांवर आघाडीवर आहे.
सत्तेत आल्यास महिलांना अडीच हजार रुपये प्रति महिना देण्यात येईल. पाचशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल. प्रत्येक घरात २०० युनिट वीज मोफत देण्यात येईल. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना १५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. शेतीत काम करणाऱ्या मजुरांना 12 हजार रुपये देण्यात येतील. पात्र लाभार्थ्यांना दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येईल.
पाच लाख रुपयांचा विमा देण्यात येईल. प्रत्येक परिवाराला दहा लाख रुपये अनुदानाची 'दलित बंधू' योजना सुरुवात करण्यात येईल. ९३ लाख परिवारांना जीवन विमा देण्यात येईल. हैदराबादमध्ये एक लाख घर बनवण्यात येतील. आसरा पेन्शनची रक्कम वाढवून ३ हजार करण्यात येईल. जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यात येईल.
पेट्रोल, डिझेल वरील व्हॅट कमी करण्यात येईल. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक चार गॅस सिलेंडर मोफत देण्यात येतील. छोट्या शेतकऱ्यांना बी बियाणे घेण्यासाठी मदत अडीच हजार रुपये मदत करण्यात येईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येतील. जन्मतः मुलीला दोन लाख रुपये देण्यात येतील.