Cyclone Michaung | बंगालच्या उपसागरात ३ डिसेंबरला मिचौंग चक्रीवादळ; IMD ची माहिती

Cyclone Michaung
Cyclone Michaung
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील हवामानात सतत बदल होत असलेला दिसून येते आहे. दरम्यान, रविवारी ३ डिसेंबरच्या सुमारास नैऋत्य बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. तर हे चक्रीवादळ सोमवारी ४ डिसेंबरच्या सुमारास चेन्नई आणि मछलीपट्टणम दरम्यान उत्तर तमिळनाडू किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. (Cyclone Michaung)

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र शुक्रवारी (दि.१) तीव्र झाले आहे. ते पश्चिम आणि वायव्य दिशेकडे पुढे सरकत असून, २ डिसेंबरपर्यंत ते खोल दबावात जाण्याची शक्यता आहे. पुढे 3 डिसेंबरच्या सुमारास या कमी दाबाचे बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. पुढे ते ४ डिसेंबरच्या संध्याकाळी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम आणि चेन्नई दरम्यानचा किनारा ओलांडेल, असे IMD ने म्हटले आहे. (Cyclone Michaung)

Cyclone Michaung : उपसागरात मुसळधार ते अतिमुसळधार

मिचौंग चक्रीवादळ किनारपट्टीच्या जवळ येत असताना IMD ने तमिळनाडू किनारपट्टी आणि अंतर्गत आंध्र प्रदेशात रविवार (दि.३) आणि सोमवारी (दि.४) 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. IMD ने तामिळनाडूची उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी आणि कराईकल येथील रहिवाशांसाठी ३ डिसेंबरला अति मुसळधार (२०४.४ मिमी पेक्षा जास्त) आणि ४ डिसेंबरला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पुढील चार दिवस नैऋत्य बंगालच्या उपसागरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान वादळी वारे आणि समुद्र खवळलेला असेल असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

मिचौंग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम नाही- IMD मुंबई

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळीने थैमान घातले आहे. राज्यातील काही भागात अतिवृष्टी आणि गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अद्याप थंडीची देखील चाहूल लागलेली नाही. दरम्यान, बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळाची निर्मिती होत असून, त्याची ३ डिसेंबरला तीव्रता वाढणार आहे. तसेच  ४ डिसेंबरच्या सुमारास हे चक्रीवादळ उत्तर तमिळनाडू किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. दरम्यान या चक्रीवादळाचा राज्यावर आणखी काही परिणाम होईल का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आयएमडी मुंबईने पुढारीशी बोलताना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, पुढील २ ते ३ दिवस महराष्ट्रातील हवामानात कोणताही जास्त परिणाम होणार नाही. राज्यातील हवामान स्थिर राहणार आहे. तसेच मिचाैंग चक्रीवादळाचा कोणताही प्रभाव महाराष्ट्रावर पडणार नसल्याचे आयएमडी मुंबईने सांगितले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news