PMGKAY : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पुढील ५ वर्षांपर्यंत मिळणार ‘मोफत रेशन’ | पुढारी

PMGKAY : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पुढील ५ वर्षांपर्यंत मिळणार 'मोफत रेशन'

पुढारी ऑनलाईन डेस्क : ८१ कोटी गरीब जनतेसाठी मोफत रेशन योजना ५ वर्षांसाठी वाढवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळातील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी बुधवारी माहिती देत सांगितले की, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) १ जानेवारी २०२४ पासून पुढील पाच वर्षांपर्यंत वाढवण्यात आलीय. (PMGKAY)

१ जानेवारी २०२४ पासू डिसेंबर २०२८ पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ मिळेल. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितले की या योजनेसाठी ११.८ लाख कोटी रुपये खर्च येईल.

या योजनेचा विस्तार आधी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत करण्यात आला होता. पण आता बैठकीत, पुढील ५ वर्षे ही योजना वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या योजनेत राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम अंतर्गत प्रति लाभार्थीला प्रत्येक ५ महिन्याला ५ किग्रॅ. मोफत रेशन दिले जाते.

२०२३ च्या अर्थसंकल्पातील घोषणेदरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटले होते की, PMGKAY अंतर्गत संपूर्ण वर्षभरासाठी २ लाख कोटी उपलब्ध करून देण्यात येईल.

Back to top button