Uttarkashi tunnel rescue | ब्रेकिंग! उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ‘४१ श्रमवीरांनी’ १७ व्या दिवशी घेतला सुटकेचा श्वास! | पुढारी

Uttarkashi tunnel rescue | ब्रेकिंग! उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या '४१ श्रमवीरांनी' १७ व्या दिवशी घेतला सुटकेचा श्वास!

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांपर्यंत पोहचण्यास आज अखेर मंगळवारी (दि.२८) १७ व्या दिवशी बचावपथकाला यश आले. आज सायंकाळी सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. एएनआयने याबाबत एक्स पोस्ट करुन माहिती दिली. या बचावकार्यानंतर स्थानिकांनी मिठाई वाटत आनंद देखील साजरा केला जात आहे. Uttarkashi tunnel rescue

गेले १७ दिवसांचे हे बचावकार्य युद्धपातळीवर करण्यात सुरु होते. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर आज (दि. २८) सायंकाळी ४१ कामगारांना पाईपमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेमधून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. अखेरच्या क्षणी एनडीआरएफ पथकाने बोगद्यात प्रवेश केला आणि कामगारांना मदतीचा हात दिला. बोगद्याच्या ठिकाणी ३० खाटांची तात्पुरती वैद्यकीय सुविधाही उभारण्यात आली. तसेच सिल्क्यारा बोगद्यामधून कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी चिन्यलिसौर हवाईपट्टीवर चिनूक हेलिकॉप्टर तैनात ठेवण्यात आले होते. Uttarkashi tunnel rescue

उत्तराखंड आपत्ती प्रतिसाद दल, एनडीआरएफ, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, रेल्वे आणि इतर सरकारी यंत्रणांचा बचावकार्यात समावेश आहे. विशेष म्हणजे बचावकार्यात उत्तरखंड प्रशासनाने कोणतेही कसर ठेवली नाही. (Uttarkashi tunnel rescue) आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोगदा तज्ज्ञ ख्रिस कूपर, अर्नोल्ड डिक्स यांनीही या बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

१२ नोव्हेंबरपासून बोगद्यात अडकलेले ४१ कामगार

सिल्क्यारा ते बारकोट हा बांधकामाधीन बोगदा सुमारे ६० मीटरच्या भागात कोसळल्याने १२ नोव्हेंबरपासून ४१ कामगार आत अडकले होते. गेल्या काही दिवसांत या कामगारांना वाचवण्यासाठी उत्तराखंड प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्टा केली. बचावकार्याच्या अखेरच्या टप्प्यात व्हर्टिकल ड्रिलिंग थांबवून मॅन्युअल ड्रिलिंग यशस्वीरित्या करण्यात आले आणि बचावपथक कामगारांपर्यंत पोहचले.

कामगारांना बाहेर काढताच रुग्णवाहिकांमधून सर्व कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. बोगद्याजवळ डॉक्टर आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. रुग्णालयापर्यंतचा ३५ किमीचा रस्ता झिरो झोन करण्यात आला आहे. या मार्गावर इतर कोणत्याही प्रकारची वाहतूक थांबवण्यात आली होती.

टेकडीवरील व्हर्टिकल ड्रिलिंग आज ५४ मीटरवर थांबवण्यात आले. बोगद्याच्या आत मॅन्युअल ड्रिलिंग यशस्वीरित्या करण्यात आले. ड्रिलिंग कामात कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री करण्यासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग थांबविण्यात आल्याचे बचावपथकाकडून सांगण्यात आले होते.

ज्यावेळी कामगारांना बोगद्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले त्यावेळी बोगद्याच्या ठिकाणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी आज मंगळवारी ४१ कामगार सुरक्षित बाहेर यावेत यासाठी सिल्क्यारा बोगद्याच्या ठिकाणी पुजाऱ्यांसोबत प्रार्थनाही केली. बोगद्याच्या ठिकाणी डॉक्टरांचे वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या होत्या.

संबंधित बातम्या 

बचावकार्यादरम्यान अडथळा

बचावकार्यादरम्यान केवळ सहा मीटर खोदकाम बाकी असताना ऑगर मशीनमध्ये बिघाड झाला होता. मशीनमध्ये बिघाड झाल्याने खोदकाम काहीवेळ बंद ठेवण्यात आले होते. ड्रिलिंगच्या कामातील तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी दिल्लीतील तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी मशीनची दुरुस्ती केली. त्यानंतर बचावकार्य पुन्हा सुरु केले होते.

उत्तराखंड येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बोगद्यात जाऊन मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्यामुळे मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. (Uttarkashi Tunnel Rescue)

क्षणाक्षणाला उत्सुकता….

एनडीएमएचे सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास पत्रकार परिषदेत बचावकार्याविषयी माहिती देताना सांगितले होते की, “आम्ही ५८ मीटरवर आहोत. आता केवळ थोडे अंतर बाकी आहे. आत अडकलेल्या कामगारांनी सांगितले की त्यांना आवाज ऐकू येत आहेत.”

प्रत्येक कामगाराला बाहेर काढण्यासाठी ३-५ मिनिटे लागतील असा अंदाज आहे. सर्व ४१ जणांना बाहेर काढण्यासाठी ३-४ तास लागतील अशी शक्यता आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या बोगद्यात जाऊन बाहेर काढण्याचे आयोजन करेल. त्यांना एसडीआरएफ (SDRF) मदत करेल. पॅरामेडिक्सदेखील बाहेर काढण्याच्या वेळी बोगद्याच्या आत जातील, असे हसनैन यांनी सांगितले.

आज दुपारच्या सुमारास आणखी १.५ मीटर पाईप पुढे ढकलण्यात आली. दुपारपर्यंत बोगद्यात एकूण ५५.३ मीटर पाईप ढकलण्यात आली. केवळ ३ अथ‍वा ५ मीटर अंतर शिल्लक राहिले होते. एकूण लांबी ५७ ते ५९ मीटर आहे. संध्याकाळपर्यंत बचावकार्याला यश मिळेल, असे समन्वय नोडल अधिकारी नीरज खैरवाल यांनी म्हटले होते.

आज १७ व्या दिवशीच्या बचावकार्याविषयी कोण काय म्हणाले?

उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेले ४१ कामगार सुरक्षित आहेत आणि त्यांना ऑक्सिजनपासून अन्न आणि पाण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत करण्यात आली. बचावकार्य वेगाने करण्यात आले. आमचे सर्व शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, भारत सरकार आणि राज्य सरकार आणि इतर एजन्सींनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पंतप्रधान मोदी यांनीदेखील दररोज बचावकार्याचा आढावा घेतला.
पुष्कर सिंह धामी, मुख्यमंत्री उत्तराखंड

हेही वाचा :

Back to top button