भाचीला लग्नात दिली चक्क १ कोटींहून अधिक वधुदक्षिणा | पुढारी

भाचीला लग्नात दिली चक्क १ कोटींहून अधिक वधुदक्षिणा

रेवाडी, वृत्तसंस्था : हरियाणातील रेवाडी शहरातील एका गर्भश्रीमंत मामाने हिंदू परंपरेनुसार दिला जाणार्‍या वधुदक्षिणेचे (शगुन) अनोखे उदाहरण घालून दिल्याने त्याची चर्चा देशभरात रंगली आहे. भाचीच्या लग्नात मामाने चक्क1 कोटी 1 लाख 11 हजार 101 रुपयांची वधुदक्षिणा देत आपल्या विधवा बहिणीच्या घरात नोटांचा ढीग लावला. इतकेच नाही, तर या गर्भश्रीमंताने कोट्यवधीच्या सोन्याच्या दागिन्यांसह अन्य आहेरही भेट म्हणून दिला आहे, हे विशेष!

याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. सतबीर असे या गर्भश्रीमंत व्यक्तीचे नाव असून ते आसलवास गावाचे रहिवाशी आहेत. सतबीर यांनी आपल्या भाचीच्या लग्नात कोणतीही कसर सोडलेली नाही. सायंकाळी वधुदक्षिणेचा विधी सुरू झाला त्यावेळी सतबीर यांनी काही लोकांना घेऊन रोकड आणली. 1 कोटी 1 लाख 11 हजार 101 रुपयांची रोकड आणि कोट्यवधीचे सोने आणि अन्य आहेर पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Back to top button