तिरुमलातील तिरुपती बालाजी मंदिरात पंतप्रधानांनी केली पूजा

File Photo
File Photo

तिरुपती; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेलंगणातील तिरुमला मंदिराला भेट दिली. भगवान व्यंकटेश्वराच्या विशेष पूजेत पंतप्रधानांनी सहभाग घेतला. पंतप्रधानांनी तिरुपती मंदिर भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावरही शेअर केली आहेत. 140 कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी मी बालाजीला प्रार्थना केल्याचे या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधान 3 दिवसांच्या तेलंगणा दौर्‍यावर आहेत. रविवारी (दि. 26) ते तिरुपतीला पोहोचले. पंतप्रधान स्वत: भेट देणार असल्याने सोमवारी तिरुपती देवस्थानमने अन्य व्हीआयपी दर्शन रद्द केलेले होते. सकाळीच पंतप्रधान मंदिरात पोहोचले. मंदिराच्या ध्वजस्तंभाला त्यांनी अभिवादन केले. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मंदिरात विशेष पूजा केली. याआधी पंतप्रधानांनी 2019 मध्ये या मंदिराला भेट दिली होती.
तत्पूर्वी, तिरुपती विमानतळावर आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

तिरुमलामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. रेनिगुंटा विमानतळ ते तिरुमला हिलकडे जाणार्‍या रस्त्यांवर चौक्या केल्या होत्या. सुरक्षा कर्मचारी तैनात होते. येथून ते तेलंगणात प्रचारासाठी रवाना झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news