पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी ( 26/11 Mumbai attacks ) झालेल्या दहशतवादी हल्ला आम्ही कधीच विसरु शकत नाही. याच दिवशी देशावर सर्वात भयंकर दहशतवादी हल्ला झाला होता. हा सर्वात नृशंस दहशतवादी हल्ला होता. आज संपूर्ण देश या हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या शूरवीरांचे स्मरण करत आहे. या घटनेनंतर भारताने आपली संपूर्ण क्षमता वापरली आणि आता तेच धैर्य दहशतवादाला चिरडण्यासाठी वापरत आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून २६/११ हल्ल्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली. (PM Modi Mann Ki Baat )
मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. मात्र या या घटनेतून सावरण्यासाठी भारताने आपली संपूर्ण क्षमता वापरली आणि आता तेच धैर्य दहशतवादाला चिरडण्यासाठी वापरत आहे." (PM Modi Mann Ki Baat )
संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, १९४९ साली या दिवशी संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली होती. 2015 साली आपण बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी केली. तेव्हा २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना समोर आली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत.
पंतप्रधान म्हणाले की, संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस लागले. 60 हून अधिक देशांच्या घटनांचा अभ्यास करून राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला असून त्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी दोन हजारांहून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. 1950 मध्ये राज्यघटना लागू झाल्यानंतरही आतापर्यंत एकूण 106 घटनादुरुस्ती करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, संविधानाची पहिली दुरुस्ती भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी होती हे दुर्दैवी आहे. आणीबाणीच्या काळात झालेल्या चुका 44 व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सुधारण्यात आल्या, असेही पंतप्रधानांनी मन की बातच्या माध्यामून सांगितले.
डिजिटल पेमेंटबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता लोक अधिकाधिक डिजिटल पेमेंट करत आहेत, हे देखील खूप उत्साहवर्धक आहे भारतातील डिजिटल क्रांतीच्या यशामुळे हे पूर्णपणे शक्य झाले आहे. 2022 मध्ये भारतीयांच्या पेटंट अर्जांमध्ये 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यात पेटंट दाखल करण्यात आघाडीवर असलेल्या टॉप-10 देशांमध्ये असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. सरकारने केलेल्या प्रशासकीय आणि कायदेशीर सुधारणा. त्यानंतर आज आपली तरुणाई मोठ्या प्रमाणावर नवीन ऊर्जेने नवनिर्मितीत गुंतलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी योंनी जलसंधारण आणि अमृत सरोवरबद्दल चर्चा केली. भारतात ६५ हजार अमृत सरोवर बांधले गेले आहेत. गुजरातमधील अमरेली येथे जल उत्सव साजरा केला जातो, ज्याने जलसंधारणाबाबत जनजागृती केली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील बेल्जीपुरम युथ क्लब कौशल्य विकासावर भर देत आहे. सुरतमधील तरुणांच्या टीमने सुरत प्रकल्प सुरू केला आहे ज्याचा उद्देश सुरतला स्वच्छतेचे आणि शाश्वत विकासाचे उदाहरण बनवणे आहे. या अंतर्गत युवक सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करतात आणि आज या लोकांची संख्या 50 हजारांहून अधिक झाली आहे. या लोकांच्या टीमने लाखो किलो कचरा उचलला आहे. कोईम्बतूर, तामिळनाडू येथील लोगनाथन जी आपल्या कमाईतील काही भाग गरीब मुलांना दान करतात. त्यांनी आतापर्यंत 1500 हून अधिक मुलांना मदत केली आहे, असेही त्यांनी नमूद केले. ( PM Modi Mann Ki Baat )
सध्या काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन लग्न करण्यासाठी नवीन वातावरण तयार केले जात आहे, हे आवश्यक आहे का?, असा सवाल करत भारतीय भूमीवर भारतातील लोकांमध्ये लग्न केले तर देशाचा पैसा देशातच राहील, असेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सांगितले.
हेही वाचा :