file photo
Latest
Tamil Nadu Rain : तामिळनाडूमध्ये पावसाचा हाहाकार, शाळांना सुट्टी जाहीर
पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांना पावसाचे झोडपले आहे. अनेक ठिकाणी मुसळदार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना आज (23 नोव्हेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तिरुनेलवेली, टेनकासी, थेनी, थुथुकुडी आणि कन्नियाकुमारी जिल्ह्यांचा समावेश आहे. (Tamil Nadu Rain )
येत्या काही दिवसांतथंड वारेही वाहतील. आता दिल्ली आणि एनसीआरमध्ये हवामान बदलत आहे. सकाळी आणि संध्याकाळी पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत धुके आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दिल्लीतही पावसाची शक्यता आहे.

