‘या’ राज्यात PUC प्रमाणपत्र नसेल तर १० हजार दंड | पुढारी

'या' राज्यात PUC प्रमाणपत्र नसेल तर १० हजार दंड

पुढारी ऑनलाईन डेस्क

वाहनाचे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नसेल तर आता १० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. दिल्लीत प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणावर परिवहन विभागाने प्रदूषण पसरवणाऱ्या गाड्यांवर निर्बंध आणले आहेत. सोमवारी जवळपास सर्व ४०० पेट्रोल पंपांवर परिवहन विभागाचे पथक आणि १६०० स्वयंसेवक पथके तैनात करण्यात आली आहेत.

वाहतूक विभागाचे सहआयुक्त नवलेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, अंमलबजावणीची सर्व पथके संपूर्ण दिल्लीत तैनात करण्यात आली आहेत. ऑक्टोबरमध्ये मोहिम सुरु झाल्यानंतर ज्या वाहनांची PUC ची प्रलंबित रक्कम ६ ते ८ लाखांपर्यंत होती. पण आता सुमारे १७ लाख वाहने आहेत, ज्यांचे PUC बनवायचे आहे अशा स्थितीत विभागाची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.

दिल्लीमध्ये प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. नागरिकांनी आपल्या गाडीचे PUC करुन घ्यावे अशी विनंती सहआयुक्त नवलेंद्र कुमार सिंह यांनी केली आहे. आतापर्यंत विभागाची पथके पेट्रोल पंपावर वाहनाचा क्रमांक नोंदवून घेत होते. आणि त्यानंतर डाटाबेसवरून तपासणी करून वाहनाचे चलन पाठवले जात होते, मात्र आता वाहनांचे PUC आहे की नाही, याची ऑनलाइन तपासणी केली जाते. आणि त्यानंतर चलन पाठवले जाते.

सोमवारी पेट्रोल पंपांवर ३५ हजारांहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. जेव्हापासून ही मोहीम सुरु झाली आहे तेव्हापासून दररोज ४० हजारांहून अधिक PUC बनवले जात आहेत. पण गेल्या काही दिवसांत ही संख्या १५ ते १८ हजारांवर आली आहे, तर १७ लाख वाहनांची PUC करणे बाकी आहे.

हेही वाचलत का?

Back to top button