Tamil Nadu Rain: तामिळनाडूत मुसळधार पाऊस; अनेक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद | पुढारी

Tamil Nadu Rain: तामिळनाडूत मुसळधार पाऊस; अनेक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद

पुढारी ऑनलाईन डेस्क: तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांना पावसाचे झोडपले आहे. अनेक ठिकाणी मुसळदार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील तंजोर, तिरुवरूर, अरियालूर, मायिलादुथुराई, विल्लुपुरम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी/कारियाक्कल यासह विविध जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Tamil Nadu Rain)

भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी (दि.१३) तमिळनाडू आणि पुद्दुचेरीसाठी १३ आणि १४ नोव्हेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यानुसार तमिळनाडूत जोरदार पाऊस सुरू आहे. आज १४ नोव्हेंबर रोजी तमिळनाडूतील चेंगलपट्टू, कांचीपुरम, विल्लुपुरम, कुड्डालोर आणि पुद्दुचेरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. (Tamil Nadu Rain)

दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीमध्ये चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, तमिळनाडूत जोरदार पाऊस सुरू असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच तमिळनाडूच्या किनारी जिल्ह्यांमध्ये 115.6 ते 204.4 मिमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे, असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे. (Tamil Nadu Rain)

बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील किनारी भागात मासेमारीवर दोन दिवस बंदी घालण्यात आली आहे. असेही वृत्त एएनआयने दिले आहे.

हेही वाचा:

Back to top button