Diwali 2023 : ‘अद्भुत, अलौकिक आणि अविस्मरणीय’ : पंतप्रधान मोदींनी शेअर केले अयोध्या दीपोत्सवाचे फोटो | पुढारी

Diwali 2023 : 'अद्भुत, अलौकिक आणि अविस्मरणीय' : पंतप्रधान मोदींनी शेअर केले अयोध्या दीपोत्सवाचे फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील दीपोत्सवाचे वर्णन “अद्भुत, दिव्य आणि अविस्मरणीय” असे केले आहे. त्यांनी उत्सवाची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर लिहिले की, अयोध्येत प्रज्वलित केलेल्या लाखो दिव्यांनी संपूर्ण देश उजळून निघाला आहे.

पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये लिहिलेकी, ‘अद्भुत, अलौकिक आणि अविस्मरणीय! लाखो दिव्यांनी उजळून निघालेल्या अयोध्या नगरीच्या दीपोत्सवाने संपूर्ण देश उजळून निघत आहे. यातून निर्माण होणारी ऊर्जा संपूर्ण भारतात नवा उत्साह पसरवत आहे. प्रभू श्री राम सर्व देशवासियांचे कल्याण करतील आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी प्रेरणास्थान बनतील, अशी माझी इच्छा आहे. जय सीता राम.’
पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणे हा अभिमानास्पद अनुभव आहे. सैनिक आपल्या समर्पणाने आपले जीवन उजळून टाकतात. देश सैनिकांचा ऋणी आहे. भारतीय सशस्त्र दल आणि सुरक्षा दलांच्या शौर्याचा उत्सव, ही ऐतिहासिक भूमी आणि दिवाळीचा सण हा एक विलक्षण योगायोग आहे. हा प्रसंग माझ्यासाठी आणि देशवासियांसाठी उत्साहाने भरलेला आहे. जिथे कुटुंब हजर असेल तिथेच उत्सव होतो. सणासुदीच्या दिवशी आपल्या कुटुंबापासून दूर सीमेवर तैनात होणे, हेच कर्तव्यनिष्ठेचे शिखर आहे.

पंतप्रधान मोदींनी जवानांना मिठाई देऊन दिवाळी साजरी केली. ते म्हणाले की, १४० कोटी देशवासीयांचा हा मोठा परिवारही तुमचाच आहे. देश तुमचा ऋणी आहे. दिवाळीच्या दिवशी तुमच्या सुखासाठी प्रत्येक घरात दिवा लावला जातो. म्हणूनच प्रत्येक पूजेत तुमच्यासारख्या वीरांसाठी प्रार्थना असते.

हेही वाचा : 

Back to top button