ओवैसीचा 4 दशके हैदराबादवर वरचष्मा

ओवैसीचा 4 दशके हैदराबादवर वरचष्मा

हैदराबाद; वृत्तसंस्था : असदुद्दीन ओवैसी हे संसदेत तसेच माध्यमांतून भाजपवर सातत्याने हल्ले चढवित असतात. गृहराज्य तेलंगणात प्रचार करताना मात्र त्यांच्या टीकेचा भर काँग्रेसवर अधिक असतो. ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएम (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन) देशभरात सर्वत्र सर्व प्रकारच्या निवडणुका लढवतो. तेलंगणा या गृहराज्यात मात्र याच पक्षाने एकूण 119 पैकी केवळ 9 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी 7 जागा हैदराबाद या ओवैसींच्या बालेकिल्ल्यातीलच आहेत.

हैदराबाद लोकसभेची जागा 39 वर्षांपासून ओवैसी कुटुंबाच्याच ताब्यात आहे. याआधी 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओवैसी यांनी फक्त 8 जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी 7 जागांवर विजय मिळविला होता. दुसरीकडे याच ओवैसींनी गत विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये 95, बिहारमध्ये 20 आणि गुजरातमध्ये 13 उमेदवार उभे केले होते.

के. सी. राव यांच्या भारत राष्ट्र समितीसोबत (बीआरएस) तेलंगणात त्यांची ओपन-सिक्रेट (उघडछुपी) युती आहे. अन्य जागांवर ओवैसी बीआरएससाठीच काम करतात. बीआरएसही ओवैसींच्या विरोधात नावाला उमेदवार देते. हैदराबाद लोकसभेची जागा 39 वर्षांपासून ओवैसी कुटुंबाच्या ताब्यात आहे. महापालिकाही त्यांच्याच पक्षाच्या ताब्यात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news