‘इसिस’ कनेक्‍शन प्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या 6 विद्यार्थ्यांना अटक | पुढारी

'इसिस' कनेक्‍शन प्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या 6 विद्यार्थ्यांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने उत्तर प्रदेशच्या विविध भागातून इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा संशयितांना अटक केली. सहापैकी चार आरोपींची नावे राकीब इनाम, नावेद सिद्दीकी, मोहम्मद नोमान आणि मोहम्मद नाझिम अशी आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी अलीगढ विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित असल्‍याचे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. ( ISIS operatives )

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी देशात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची योजना आखत होते. अलीगढ विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे दहशतवादी नेटवर्क उघडकीस आले. सूत्रांनुसार, अलीगढ विद्यापीठाचा विद्यार्थी देखील केंद्रीय एजन्सीच्या रडारवर आहे. ( ISIS operatives )

पुणे इसिस (आयएस) मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केलेल्या रिझवान आणि शाहनवाज यांच्या चौकशीदरम्यान अलिगड मुस्लिम विद्यापीठातील अनेक विद्यार्थी देशविरोधी अजेंडा पसरवण्यात गुंतल्याचे उघड झाले होते. सोशल मीडिया आणि आयएसआयएसच्या संपूर्ण भारत नेटवर्कशी जोडलेले आहेत. रिझवान आणि शाहनवाजची चौकशी केल्यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे.

 

 

Back to top button