Land for jobs scam | लालू यादव यांना धक्का; जमीन घोटाळा प्रकरणी निकटवर्तीयाला ईडीकडून अटक | पुढारी

Land for jobs scam | लालू यादव यांना धक्का; जमीन घोटाळा प्रकरणी निकटवर्तीयाला ईडीकडून अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बिहारमधील नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि कुटुंबियांच्या निकटवर्तीयावर कारवाई केली आहे. ईडीने बिहारमधील जमीन घोटाळा प्रकरणी व्यावसायिक अमित कात्याल यांना चौकशीदरम्यान अटक केली आहे. दरम्यान बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचे “जवळचे सहकारी” आहेत, असे सांगितले जात आहे. असे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे. (Land for jobs scam)

ईडीच्या म्हणण्यानुसार, लालू प्रसाद यादव आणि कुटुंबांचे निकटवर्तीय अमित कात्याल यांची कंपनी नोकरीसाठी जमीन घोटाळ्यात मनी लाँड्रिंगमध्ये सामील होती. त्यांची एके इन्फोसिस्टम ही कंपनी या घोटाळ्यात मनी लाँडरिंग एजन्सी आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (CBI) रडारावर आहे. त्यानंतर ईडीकडून अनेकवेळा समन्स बजावूनदेखील अमित कात्याल हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे ईडीने त्यांच्यावर कारवाई करत, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  (Land for jobs scam)

ईडीने म्हटले आहे की, यापूर्वी कात्याल यांना अनेकवेळा तपासणी यंत्रणेकडून समन्स बजावले होते. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून ते तपास यंत्रणेचा समन्स टाळत होते. लालू प्रसाद यादव आणि कुटुंबियांचे निकटवर्तीय कात्याल यांना शुक्रवारी (दि.१०) एजन्सीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. जिथे ईडी चौकशीसाठी त्याची कोठडी मागणार आहे, असेही तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे. (Land for jobs scam)

हेही वाचा:

Back to top button