Srinagar’s Dal Lake | श्रीनगरच्या दल सरोवरात अग्नितांडव, अनेक हाऊसबोट्स जळून खाक | पुढारी

Srinagar's Dal Lake | श्रीनगरच्या दल सरोवरात अग्नितांडव, अनेक हाऊसबोट्स जळून खाक

पुढारी ऑनलाईन : पुढारी ऑनलाईन : श्रीनगरच्या दल सरोवरातील अनेक हाऊसबोट्स आगीत जळून खाक झाल्या आहेत. येथील आग विझवण्याचे काम सुरु असून सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. दल सरोवर हे श्रीनगरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. (Srinagar’s Dal Lake)

KASHMIR READER च्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की मध्यरात्री घाट क्रमांक ९ जवळील एका हाऊसबोटमध्ये पहिल्यांदा आग लागली आणि ही आग आजूबाजूच्या हाऊसबोट्समध्ये पसरली. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, आगीमुळे किमान अर्धा डझन हाऊसबोट्सचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याआधीही दल सरोवरातील हाऊसबोट्सना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

हे ही वाचा :

Back to top button