काँग्रेसचे आमदार अमीन कागजी यांचे 50 व्या वर्षी हिंदू युवतीशी दुसरे लग्न | पुढारी

काँग्रेसचे आमदार अमीन कागजी यांचे 50 व्या वर्षी हिंदू युवतीशी दुसरे लग्न

जयपूर, वृत्तसंस्था : उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री तसेच काँग्रेस नेते सचिन पायलट यांचा घटस्फोट झाल्याची माहिती याआधी सार्वजनिक झाली होती. सचिन पायलट यांचा हा विवाह जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची कन्या तसेच उमर अब्दुल्ला यांची बहीण सारा अब्दुल्ला यांच्याशी झालेला होता. दोघांना दोन मुलेही आहेत. आता याच राज्यातील काँग्रेसचे आमदार अमीन कागजी यांनी वयाच्या 50 व्या वर्षी मोना शर्मा या हिंदू युवतीशी लग्न केल्याची माहिती अशाच पद्धतीने समोर आली आहे.

अमीन कागजी यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही, हे विशेष! निवडणूक घोषणापत्रात त्यांनी मोना शर्मा यांचा दुसरी पत्नी म्हणून उल्लेख केलेला आहे. जयपूरच्या किशनपोल विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. अमीन कागजी यांच्या पहिल्या पत्नीचे नाव रेश्मा असून, त्यांच्यापासून अमीन यांना 4 मुले आहेत. मोनिका शर्मा या अमीन कागजींकडे खासगी सचिव म्हणून कार्यरत होत्या, असे सांगण्यात येते. कोरोना काळात अमीन यांनी मोना यांच्याशी निकाह केला होता आणि त्याबाबतची माहिती गुप्त ठेवली होती. मोना यांच्यापासून त्यांना एक कन्या आहे.

Back to top button