ऑक्टोबरमध्ये १.७१ लाख कोटींची विक्रमी जीएसटी वसुली | पुढारी

ऑक्टोबरमध्ये १.७१ लाख कोटींची विक्रमी जीएसटी वसुली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ऑक्टोबर महिन्यातील सणासुदीच्या काळामुळे १.७२ लाख कोटी रुपयांची विक्रमी जीएसटी वसुली झाली आहे. २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर दुसऱ्यांदा एवढी विक्रमी वसुली झालाचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. मागील वर्षी ऑक्टोबर २०२२ च्या तुलनेत जीएसटी वसुलीमध्ये तब्बल १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (GST collection)

ऑक्टोबर महिन्यात १,७२,०३३ कोटी रुपये जीएसटीपोटी वसूल

केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज ऑक्टोबर महिन्यातील जीएसटी वसुलीची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात १,७२,०३३ कोटी रुपये जीएसटीपोटी वसूल करण्यात आले. यामध्ये ३०,०६२ कोटी रुपयांचा केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी), ३८१७१ कोटी रुपयांचा राज्य जीएसटी आणि आंतरराज्यीय वाहतुकीवर आकारला जाणारा ९१,३१५ कोटी रुपयांचा आयजीएसटी तसेच १२४५६ कोटी रुपयाच्या उपकराचा समावेश आहे.

October GST collection : सरासरी वसुलीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढ

अर्थमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार २०२३-२४ मधील सरासरी १.६६ लाख कोटी रुपये जीएसटी वसुली झाली आहे, जी आधीच्या सरासरी वसुलीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढीव आहे. तर मागच्या वर्षात ऑक्टोबरमध्ये झालेल्या वसुलीपेक्षा यंदाच्या ऑक्टोबरमध्ये १३ टक्क्यांनी अधिक जीएसटी वसुलीमध्ये यश आले आहे.

केंद्राने सीजीएसटीचे ४२८७३ कोटी रुपयांचे दावे निकाली काढले आहेत. तर आयजीएसटीचे ३६६१४ कोटी रुपयांचे दावे निकाली काढले आहेत. राज्यांना एसजीएसटीपोटी ७४७८५ कोटी रुपये मिळाले असून केंद्राला ७२९३४ कोटी रुपयांची मिळकत प्राप्त झाली आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये १.८७ लाख कोटी रुपये, मेमध्ये १.५७ लाख कोटी रुपये, जूनमध्ये १.६१ लाख कोटी रुपये, जुलैमध्ये १.६५ लाख कोटी रुपये, ऑगस्टमध्ये १.५९ लाख कोटी रुपये, सप्टेंबरमध्ये १.६२ लाख कोटी रुपये जीएसटी मिळाला होता. त्यातुलनेत ऑक्टोबरमध्ये जीएसटीची विक्रमी वसुली झाली आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button