बंगळूर: बस डेपोतील १० खासगी बसेस जळून खाक (व्हिडिओ) | पुढारी

बंगळूर: बस डेपोतील १० खासगी बसेस जळून खाक (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगळूरमधील वीरभद्रनगर येथील बस डेपोमध्ये पार्क केलेल्या खासगी बसेसना मोठी आग लागली. ही घटना आज (दि.३०) दुपारी एकच्या सुमारास घडली.

बंगळूरमधील वीरभद्र नगरमधील गॅरेजजवळील बस डेपोला लागलेल्या आगीत उभ्या असलेल्या सुमारे पाच ते दहा खासगी बसेस जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये डेपोतून काळ्या धुराचे ढग उठताना दिसत आहेत.

हेही वाचा 

Back to top button