पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील साखळी बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या आज (दि.३०) तीनवर पोहोचली.रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. एर्नाकुलम येथे जेहोवापंथीय ख्रिश्चन समुदायाच्या एका सभागृहात (झामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर) रविवारी (दि.३०) सकाळी सलग तीन बॉम्बस्फोट झाले होते. (Kerala blast)
कलामासेरी सेंटरमध्ये रविवारी सकाळी (दि.२९) साडेनऊच्या सुमारास प्रार्थना सुरु असताना पाच मिनिटांत एकापाठोपाठ एक सलग तीन स्फोट झाले. पहिला स्फोट सभागृहाच्या मध्यभागी झाला. काही सेकंदांनंतर सभागृहाच्या दोन्ही बाजूला आणखी दोन स्फोट झाले, असे जेहोवाज विटनेसेस संस्थेचे स्थानिक प्रवक्ते टी. ए. श्रीकुमार यांनी सांगितले.
स्फोटातील मृतांचा आकडा आतापर्यंत तीनवर गेला आहे. रविवारी दोन महिलांचा मृत्यू झाला हाेता तर आज या स्फाेटात जखमी झालेल्या (दि.३०) १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "रविवारी (दि.२९) सकाळी या मुलीला रुग्णालयात दाखल केले हाेते. ती ९५ टक्के भाजली हाेती. उपचार सुरु असताना आज सकाळी १२.४० वाजता तिचा मृत्यू झाला".
हेही वाचा