

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील सुरतमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज (दि.२८) उघडकीस आली. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक चिठ्ठी जप्त केली आहे.
संबंधित कुटुंब आर्थिक समस्यांना तोंड देत होते. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधीक्षक राकेश बारोट म्हणाले की, "एका कुटुंबातील सात जणांनी आपलं जीवन संपवले आहे. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे. आम्ही कारण तपासत आहोत. प्राथमिक तपासात हा प्रकार आर्थिक समस्येमुळे झाला असावा, असा अंदाज आहे."
हेही वाचा :