महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप; राजस्थानात काँग्रेसची 5 निवडणूक आश्वासने

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप; राजस्थानात काँग्रेसची 5 निवडणूक आश्वासने

जयपूर, वृत्तसंस्था : राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर छत्तीसगडप्रमाणे राजस्थानमध्येही गो-हमी योजना सुरू केली जाईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉपही देण्यात येतील. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अशी 5 आणखी आश्वासने दिली आहेत. काँग्रेसच्या वॉर रूममध्ये शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानातील ईडीच्या छाप्यांवर टीका केली.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल मुंगेली जिल्ह्यातील एका बैठकीत, कुत्रे आणि मांजरींपेक्षा ईडीचे लोक रस्त्यावर जास्त फिरत आहेत, असे विधान केले होते.

तोच धागा मुख्यमंत्री गेहलोत यांनी धरला. भाजपवाल्यांकडे मुद्दे नाहीत, त्यांना केवळ ईडी हाच एक आधार वाटतो, असेही गेहलोत म्हणाले. दोन दिवसांपूर्वी प्रियांका गांधींच्या सभेत महिलांना दरवर्षी 10 हजार रुपये आणि 500 रुपयांत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

ही नवी 5 आश्वासने

1. छत्तीसगडच्या धर्तीवर गोहमी योजना. शेणखत 2 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करणार.
2. सरकारी इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून लॉटरी पद्धत बंद. सर्वांना प्रवेश दिला जाईल.
3. प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेशासोबत लॅपटॉप किंवा टॅबलेट
4. नैसर्गिक आपत्तीत पीडित कुटुंबाचा 15 लाख रुपयांपर्यंतचा विमा
5. कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.
आता ओपीएस हमी कायदा आणला जाईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news