

कोलकाता, वृत्तसंस्था : ईडीने पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना रेशन घोटाळाप्रकरणी शुक्रवारी अटक केली. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास ईडीचे पथक मलिक यांच्या निवासस्थानी धडकले. तेव्हापासून ते पुढे 20 तास ईडीने घरासह इतर 7 ठिकाणी झाडाझडती घेतली. नंतर शुक्रवारी पहाटे 4 वाजता मलिक यांना अटक करण्यात आली. मी एका कटाचा बळी ठरलो आहे, असे अटकेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मलिक यांनी सांगितले. वन खात्यापूर्वी मलिक यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार होता. याप्रकरणात याआधी उद्योगपती बाकीब उर रेहमान याला अटक करण्यात आली आहे.
रेहमानच्या सदनिकेत सरकारी कार्यालयांचे शिक्के असलेली 100 हून अधिक कागदपत्रे गेल्या आठवड्यात सापडली होती. आहेत. कोरोना लॉकडाऊन दरम्यान राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत भ्रष्टाचार झाला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपवर कठोर टीका केली आहे.