

भोपाळ; वृत्तसंस्था : बर्हाणपुरातील अपक्ष उमेदवार प्रियांक सिंह ठाकूर यांनी गाढवावर स्वार होऊन मिरवणुकीद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रकाराची मध्य प्रदेश राज्यात एकच चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी काहीच दिवस मतदारांची दखल घेणारे नेते निवडणुकीनंतर 5 वर्षे मतदारांना गाढव समजतात, हे सांगण्यासाठीच मी गाढवावरून उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलो, असे प्रियांक सिंह यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे काँग्रेस उमेदवार ठाकूर सुरेंद्र सिंह ऊर्फ शेरा भैया यांनी बैलगाडीत बसून मिरवणुकीद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर इतके वाढवून टाकले, की आम्हाला अर्ज दाखल करायला बैलगाडीवरून जावे लागत आहे, असे सुरेंद्र सिंह यांचे म्हणणे होते.