शरद पवार कृषिमंत्री असताना पैसे मिळणं दलालांवर अवलंबून : पंतप्रधान मोदी

शरद पवार कृषिमंत्री असताना पैसे मिळणं दलालांवर अवलंबून : पंतप्रधान मोदी
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा : आज आपल्या शिर्डी – नगर दौऱ्यात पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे प्रत्येकाचे लक्ष लागले होते. यावेळी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर टीका करत त्यांनी मागील सरकारवर ताशेरे ओढले. मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली. याशिवाय मुख्यमंत्र्यांचा उल्लेख कर्मठ असा केला.  आपल्या भाषणात मोदी म्हणतात, ' शिर्डीच्या या पावनभूमीला माझे कोटी कोटी नमन. पाच वर्षापूर्वी या पवित्र मंदिराला शंभर वर्षे पूर्ण झाले होते तेव्हा मला साई दर्शनाची संधी मिळाली होती. आज 7 500 कोटीच्या विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी मी आलो आहे. या ठिकाणाला पाच दशकापासून निळवंडेची प्रतीक्षा होती, तेही पूर्ण झाले. हे माझं भाग्य इथे  जलपूजनाचे संधी मिळाली. शिर्डीच्या मंदिरात दर्शनरांगेच उद्घाटन केलं. यामुळे देश-विदेशातील भाविकांना सुविधा मिळेल. या दरम्यान आजच मला देशाचे अनमोल रत्न वारंकरी संप्रादयाचे वैभव बाबा महाराज वैकुंठगमनाची बातमी कळली. त्यांनी आयुष्यभर किर्तन, प्रवचनातून समाज जागृती केली, ते पुढच्या पिढीला प्रेरणा देईल. त्यांची प्रेमळ वाणी, शैली मन जिंकत होती. त्यांच्या वाणीत जय जय रामकृष्ण हरी भजनाची अनुभती पाहिली. मी बाबा महाराज सातारकरांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो.

'सबका साथ सबका विकास मंत्रावर सरकार चालते'. सरकारची प्राथमिकता गरीबांचे कल्याण आहे. त्यासाठी सरकारचे बजेटही वाढते आहे. महाराष्ट्रात 1 कोटी 10 लाख आयुष्यमान कार्ड दिले जात आहे. यामध्ये कार्डधारकांना 5 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार गॅरंटी आहे. आयुषमान भारतवर 70 हजार कोटी खर्च केले आहे. आमच्या सरकारने मोफत रेशनलाही 4 लाख कोटी पेक्षा जास्त खर्च केले आहेत . 4 लाख कोटी गरीबांच्या घरासाठी खर्च केले. ही आकडेवारी 2014 च्या पूर्वी 10 वर्षातील तुलना सहापट अधिक आहे. आधीच्या सरकारने लाखो-करोडेचे आकडे सांगितले. 2014 पूर्वीही हे आकडे होते.  पण इतके कोटी, भ्रष्टाचार,गफला याचे होते. मात्र आज विकासाचे आकडे आहेत..

आधीच्या सरकारने शेतकर्‍यांच्या नावाने मतांचे राजकारण करणार्‍यांना थेंब थेंब पाण्यासाठी तरसावले. 1970 मध्ये या प्रकल्पाच  भूमीपूजन झालं. पाच दशकं लागली ते पूर्ण व्हायला. आता मात्र आमच्या सरकारने तेजीत काम केले. आता डावा कालवा सुरू झाला आहे. लवकरच उजवाही सुरू होईल. केंद्रात सरकारमध्ये असलेले कृषी मंत्री महाराष्ट्राचा नेता यांना व्यक्तीगत सन्मान, पण शेतकर्‍यांसाठी काय केले हे पाहणं महत्त्वाचं आहे.  60 वर्षात साडेतीन लाख कोटी रुपयांचे एमएसपी अन्नधान्य खरेदी केले. आम्ही आमच्या कार्यकाळात साडेतेरा लाख कोटीचे एमएसपी धान्य खरेदी केले. 1 लाख 15 हजार कोटी दलालांच्या खाती दिले. ते कृषीमंत्री असताना पैशासाठी दलालांच्या भरवाशावर रहावे लागत होते. पैशासाठी महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागत होती. आमच्या सरकारने थेट बँक खात्यात पैसे दिले. एमएसपीची रब्बीसाठी घोषणा केली. हरबरा 105, गहू 125 ने वाढ केली. राज्यातील शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. आमचा संकल्प आहे कि देशाच्या 100 व्या स्वातंत्र्यदिन आपण विकसित भारत म्हणून साजरा करू या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news