Jammu and Kashmir : जम्मू-काश्मिरातील रोहिंग्यांची वाढती संख्या धोकादायक | पुढारी

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मिरातील रोहिंग्यांची वाढती संख्या धोकादायक

जम्मू; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये म्यानमारच्या एका महिलेला अधिवास दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर रोहिंग्यांबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहे. काश्मीरमधील वृद्ध, अपंग आणि गरिबांची रोहिंग्या महिलेबरोबर लग्न लावून देण्याचे रॅकेट असल्याची धक्कादायक माहिती अधिवास प्रमाणपत्र तयार करणार्‍या आरोपीकडून मिळाली आहे. (Jammu and Kashmir)

संबंधित बातम्या : 

रोहिंग्या महिलांना सुमारे 20 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत विकत घेतले आहे. मूळ म्यानमारची अन्वरा ही किश्तवाडा जिल्ह्यातील एका तरुणाची पत्नी असून अन्वराकडे काश्मीरचे रहिवासी प्रमाणपत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्वराने 2020 मध्ये काश्मीरचे रहिवास प्रमाणपत्र मिळवले असून आता पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रमाणपत्र देणारी महिला, एक सूत्रधार आणि प्रमाणपत्र जारी करणार्‍या अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जम्मू-काश्मीर खोर्‍यात रोहिंग्या निर्वासितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 2012 पासून खोर्‍यात आतापर्यंत 8 हजार रोहिंगे आले आहेत. केंद्र सरकारने मार्च 2021 मध्ये बेकायदा राहणार्‍या रोहिंग्या निर्वासितांची ओळख पटवण्यासाठी मोहीम सुरू केली. याअंतर्गत बायोमेट्रिक आणि अन्य चाचण्यांनंतर 300 बेकायदा निर्वासितांना जम्मूच्या हिरानगर तुरुंगातील एका केंद्रात ठेवले आहे. या केंद्रात पोलिस आणि कैद्यांमध्ये अनेक वेळा चकमकी झाल्या आहेत.

हिंदूबहुल भागात राहण्याचा आरोप

निर्वासितांना जम्मू-काश्मीत खोर्‍यात प्रवेश देऊन लोकसंख्येचे प्रमाण बदलण्याचे कट असल्याचा आरोप भाजप, शिवसेना या पक्षांनी केला आहे. सर्व रोहिंग्या मुस्लिम आहेत आणि यापैकी बहुतेक जम्मूतील हिंदूबहुल भागात राहतात, असे या पक्षांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button