Gujarat ATS Action: गुजरात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; अहमदाबाद येथून पाकिस्तानी हेराला अटक | पुढारी

Gujarat ATS Action: गुजरात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; अहमदाबाद येथून पाकिस्तानी हेराला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क: गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने आज (दि.२०) मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानला संवेदनशिल माहिती पुरवणाऱ्या हेराला गुजरात एटीसने अटक केली आहे. संबंधित इसम हा प्रथम पाकिस्तानी नागरिक असून नंतर त्याला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Gujarat ATS Action)

एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, गुजरात एटीएसने पाकिस्तानला संवेदनशील माहिती पाठवणाऱ्या एका हेराला आनंद जिल्ह्यातील तारापूर शहरातून अटक केली. संबंधित हेर पाकिस्तानी भारतीय नागरिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. (Gujarat ATS Action)

पाकिस्तानी गुप्तहेराच्या अटकेवर, गुजरात एटीएसचे एसपी ओम प्रकाश जाट म्हणाले, “गुजरात एटीएसला लष्करी गुप्तचरांकडून इनपुट मिळाले होते. पाकिस्तानी लष्कर किंवा एजंट भारतीय सिम कार्डवर व्हॉट्सअॅप वापरत आहे. संबंधित हेर फोन ऍक्सेस करण्यासाठी रिमोट ऍक्सेस ट्रोजन (आरएटी) मालवेअर पाठवणे आणि संवेदनशील माहिती चोरणे हे उद्योग करायचा, असे एसपी जाट यांनी स्पष्ट केले आहे. (Gujarat ATS Action)

प्रथम सिमकार्ड जामनगर येथील मुहम्मद सकलेन थाइम या नावाने जारी करण्यात आले होते. ते अजगर हाजीभाई यांच्या मोबाइलवर अ‍ॅक्टिव्हेट करण्यात आले होते. सक्रिय झाल्यानंतर सिम कार्ड आनंद, तारापूर येथे पाकिस्तान दूतावासाशी संबंधित एका व्यक्तीच्या सूचनेवरून लाभशंकर माहेश्वरी नावाच्या व्यक्तीला वितरित करण्यात आले. लाभशंकर माहेश्वरी हे पाकिस्तानी नागरिक होते जे 1999 मध्ये भारतात आले होते, त्यांना नंतर भारतीय नागरिकत्व मिळाले. त्यांना मोठे कुटुंब आहे. तसेच संबंधित व्हॉट्सअॅप नंबर अजूनही पाकिस्तानमध्ये सक्रिय आहे. ते भारतीय लष्कराच्या जवानांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करत आहेत, असे देखील गुजरात एटीएसचे एसपी ओम प्रकाश जाट यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. (Gujarat ATS Action)

Back to top button