इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू सैतान! : असदुद्दीन ओवैसी

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू सैतान! : असदुद्दीन ओवैसी

हैदराबाद; वृत्तसंस्था :  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सैतान असल्याचे वादग्रस्त वक्तव्य एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.

पॅलेस्टिनी नागरिकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो. इस्रायल आणि हमासच्या युद्धात दोन्हीकडील हजारो लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. पॅलेस्टाईन केवळ मुसलमानांचा विषय नाही तर एक मानवाधिकाराचा मुद्दा आहे.  नेतान्याहू एक सैतान, अत्याचारी आणि युद्ध गुन्हेगार आहे. गाजातील सुमारे 10 लाख लोक बेघर झाले आहेत. गाजातील गरिबांनी तुमचे काय बिघडवले आहे. गेल्या 70 वर्षांपासून इस्रायलने गाजावर आपला कब्जा केला आहे. याकडे जगाचे लक्ष काय जात नाही? असेही ओवैसी म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news