चीनकडून फंडिंग प्रकरणी न्यूजक्लिकच्या कर्मचार्‍यांच्या घरांवर दिल्‍ली पोलिसांचे छापे

file photo
file photo

दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन चीनकडून फंडिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (मंगळवार) न्यूजक्लिकशी (NewsClick) संबंधित कर्मचाऱ्यांच्या ठिकाणांवर छापा टाकला. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, या काळात अनेक कर्मचाऱ्यांची चौकशीही करण्यात आली आहे. मात्र कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ही झडती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी घेतली.

चीनकडून निधी मिळण्याच्या आरोपांच्या दरम्‍यान आज (मंगळवार) सकाळी न्यूज पोर्टल न्यूजक्लिक (News Click) शी संबंधीत अनेक कर्मचाऱ्यांच्या ठिकाणांवर तपासणी करण्यात आली. ही तपासणी दिल्‍ली पोलिसांच्या विशेष सेलच्या अधिकाऱ्यांनी केली. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्‍तानुसार या दरम्‍यान अनेक कर्मचाऱ्यांशी या प्रकरणी चौकशीही झाली आहे. मात्र कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या संबंधीत तपासात पत्रकार अभिसार शर्मा यांनी त्‍यांच्या एक्‍स अकाउंटवर पोस्‍ट करून या विषयी माहिती दिली आहे. त्‍यांनी म्‍हटलंय की, दिल्‍ली पोलिसांनी त्‍यांच्या घरी छापा मारला आहे आणि तपासासाठी त्‍यंचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करून नेला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news