Uttarakhand Earthquake : उत्तरकाशीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के | पुढारी

Uttarakhand Earthquake : उत्तरकाशीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

पुढारी ऑनलाईन डेस्क : भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात पुन्हा एकदा आज (दि.२५) सकाळी ८.३५ च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याचे वृत्त आहे. जेव्हा भूकंपाचे धक्के बसले तेव्हा भीतीने लोक घराबाहेर पडले. या वर्षातच उत्तरकाशीमध्ये कमी तीव्रतेचे भूकंप अनेक वेळा झाले आहेत. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी भेगा पडल्याने घबराटीचे वातावरण आहे.

उत्तरकाशी सर्वात संवेदनशील जिल्हा

उत्तराखंडमधील उत्तरकाशी, पिथौरागढ, चमोली आणि बागेश्वर जिल्हे भूकंपासाठी संवेदनशील आहेत. उत्तराखंड झोन पाचमध्ये येतो. गढवालमधील उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग जिल्हा आणि कुमाऊंमधील कपकोट, धारचुला, मुन्सियारी परिसर भूकंपाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील आहेत. या भागांमध्ये उत्तरकाशी हे सर्वात संवेदनशील क्षेत्र आहे. उत्तरकाशी हे भूवैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील झोन-४ आणि ५ मध्ये येते. १९९१ मध्ये उत्तरकाशीमध्ये भूकंपामुळे मोठी हानी झाली होती. ६.८ रिश्टर स्केलच्या या भूकंपात ७६८ जणांना जीव गमवावा लागला. १८०० लोक गंभीर जखमी झाले आणि तीन हजार कुटुंबे बेघर झाली होती.

Back to top button