Mumbai News : बेडरूममध्ये घुसून सुनेवर सासऱ्याचा लैंगिक अत्याचार | पुढारी

Mumbai News : बेडरूममध्ये घुसून सुनेवर सासऱ्याचा लैंगिक अत्याचार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : घरातील छोट्या मोठ्या कारणावरून वाद घालून मारहाण करत पतीसह सासरच्या मंडळींनी कौटुंबिक छळ केला. त्यांचे हे अत्याचार एवढ्यावरच थांबले नाही. सासऱ्याने बेडरूममध्ये घुसून लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप करत विवाहितेने पोलिसांत धाव घेतली आहे.

विवाहितेच्या तक्रारीवरुन पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून पंतनगर पोलीस तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी २०२२ ते ११ जून २०२३ या दरम्यान ही घटना घडली आहे. यातील आरोपी पती, सासू, सासरे आणि दोन नणंदा यांनी पीडित विवाहितेशी घरातील छोट्या मोठया कारणावरून वाद घालून हाताने मारहाण करुन त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.

तसेच १० जूनच्या रात्री आठच्या सुमारास सासऱ्याने स्वयंपाकघराच्या खिडकीतून बेडरूममध्ये प्रवेश करून जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button