नूह हिंसाचार प्रकरणी काँग्रेस आमदार मम्मन खान यांना १४ दिवसांची कोठडी | पुढारी

नूह हिंसाचार प्रकरणी काँग्रेस आमदार मम्मन खान यांना १४ दिवसांची कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरियाणातील नूह हिंसाचार प्रकरणी न्यायालयाने काँग्रेस आमदार मम्मन खान यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नूह हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचे आमदार मम्मन खान यांना १५ सप्‍टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. ३१ जुलै रोजी झालेला हिंसाचार पसरवल्याच्या आरोपाखाली मम्मन खान यांना यांना जयपूरमधून ताब्यात घेतले होते. यापूर्वी झिरका मतदारसंघातील काँग्रेस आमदार मम्मन खान यांची सुरक्षा सरकारकडून काढून घेतली होती. (Nuh Violence)

नूह हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ६० गुन्‍हे दाखल झाले आहेत. तर ३३० जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंसाचार भडकावल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तपासात काही YouTube आणि टेलिग्राम चॅनल असल्याचे आढळून आले आहे.

 

 

Back to top button