मंत्र्याने केली रामचरितमानसची तुलना पोटॅशियम सायनाईडशी | पुढारी

मंत्र्याने केली रामचरितमानसची तुलना पोटॅशियम सायनाईडशी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानसची तुलना पोटॅशियम सायनाईडशी केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. हिंदी दिनाच्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या विधानाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.

पाटण्यात झालेल्या कार्यक्रमात चंद्रशेखर म्हणाले होते की, रामचरितमानसमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत; पण जर भोजनात 56 पदार्थ वाढले आणि त्यातील एकात पोटॅशियम सायनाईड टाकले, तर ते भोजन खाण्यालायक राहत नाही. ते विषारी होते. रामचरितमानसमध्येही काही बुरसटलेले आणि प्रतिगामी विचार आहेत. हे मीच नाही तर हिंदीतील महान साहित्यिक नागर्जुन आणि विचारवंत राम मनोहर लोहिया यांनीही म्हटले आहे. चंद्रशेखर यांचे विधान व्हायरल होताच भाजपने कडाडून हल्ला चढवत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चंद्रशेखर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी केली.

हेही वाचा : 

Back to top button