Stock Market Updates | शेअर बाजार नव्या शिखरावर, सेन्सेक्स, निफ्टीने गाठला सर्वकालीन उच्चांक | पुढारी

Stock Market Updates | शेअर बाजार नव्या शिखरावर, सेन्सेक्स, निफ्टीने गाठला सर्वकालीन उच्चांक

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील महागाईवाढीच्या आकडेवारीने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीला विराम देण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने आज पुन्हा तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी वाढून ६७,७०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक ६९ अंकांच्या वाढीसह उच्चांकी २०,१३८ वर पोहोचला. त्यानंतर दोन्ही निर्देशांक उच्च पातळीवरुन खाली आले.

निफ्टीने सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. तर सेन्सेक्सने २० जुलैनंतर पहिल्यांदाच नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्स आज ६७,६२७ वर खुला झाला होता. त्यानंतर तो आज ६७,७७१ पर्यंत वाढला.

आज सर्व १३ प्रमुख क्षेत्रांमध्ये वाढ दिसून येत आहे. मेटल स्टॉक्स सुमारे २ टक्क्यांनी वाढले आणि रिअल्टी स्टॉक्स १ टक्क्याहून अधिक वधारले आहेत. स्मॉलकॅप आणि मिडकॅप प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले आहेत. सेन्सेक्सवर टाटा स्टील टॉप गेनर आहे. हा शेअर २ टक्क्यांहून अधिक वाढून १३२ रुपयांवर पोहोचला. टेक महिंद्राचा शेअर १ टक्के वाढून १,२७२ रुपयांवर व्यवहार करत आहे. जेएसडब्ल्यू स्टील, एम अँड एम, विप्रो, एलटी, टाटा मोटर्स, मारुती, पॉवर ग्रिड, इन्फोसिस, टेक महिंद्रा हे शेअर्स वाढले आहेत. तर एशियन पेंट्स, आयटीसी, टायटन, बजाज फायनान्स, टीसीएस, सन फार्मा हे शेअर्स घसरले आहेत.

दरम्यान, आशियाई बाजारात तेजी दिसून येत आहे.

Back to top button