Gold Loot Criminal : देशातील सर्वात मोठ्या सोने लूट प्रकरणातील आरोपीची हत्या | पुढारी

Gold Loot Criminal : देशातील सर्वात मोठ्या सोने लूट प्रकरणातील आरोपीची हत्या

हाजीपूर, वृत्तसंस्था : Gold Loot Criminal : बिहारमधील हाजीपूरमध्ये देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या लूट प्रकरणातील प्रमुख आरोपी युसूफ कौशल्य ऊर्फ हनीराज याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांनी हनीराजचा पाठलाग करून त्याच्यावर 7 गोळ्या बेछूटपणे झाडल्या. त्यामुळे हनीराज जागीच ठार झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. हनीराज पायी रस्त्यावरून जात असताना दोन मोटारसायकलींवर चार हल्लेखोर येतात. त्यांच्या हातात बंदूक असून त्यांना पाहून हनीराज पळू लागतो.

गाड्या सोडून हल्लेखोर हनीराजचा पाठलाग करतात आणि त्याच्यावर बेछूट गोळीबार करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हनीराज हा 50 किलो सोने लूटप्रकरणातील आरोपी होता. त्याची सहा महिन्यांपूर्वी तुरुंगातून सुटका झाली होती. घरी जेवण करण्यासाठी येत असल्याचे हनीराजने आपल्या बहिणीला फोनवरून सांगितले होते; मात्र तो घरी आलाच नाही. त्यानंतर हनीराजच्या मित्राचा फोन बहिणीला आला आणि त्याने तिच्या भावाला गोळ्या झाडल्याचे सांगितले. मित्रांनीच हनीराजची हत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. Gold Loot Criminal

हे ही वाचा :

Back to top button