उदयनिधींची जीभ पुन्‍हा घसरली; म्‍हणाले, ‘विषारी सापाला भाजप …’ | पुढारी

उदयनिधींची जीभ पुन्‍हा घसरली; म्‍हणाले, 'विषारी सापाला भाजप ...'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सनातन धर्मावर वादग्रस्‍त विधान केल्‍यामुळे चर्चेत आलेले तामिळनाडूचे मुख्‍यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन ( Udhayanidhi Stalin ) यांची जीभ पुन्‍हा घसरली.  रविवारी तामिळनाडूच्या नेवेली येथे एका विवाह समारंभात बोलताना त्‍यांनी भाजपला ‘विषारी साप’ असे संबोधल्‍याने पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.

काही दिवसांपूर्वी लोकसभा खासदार आणि द्रमुकचे उपसरचिटणीस ए राजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सापाशी केल्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन यांनी  भाजपवर बोचरी टीका करताना विषारी साप असे संबोधले आहे. रविवारी अण्‍णाद्रमुकची खिल्‍ली उडवताना उदयनिधी स्टॅलिन म्‍हणाले की, ‘अण्‍णाद्रमुक पक्षाला कचरा मानताे. विषारी सापाला भाजप मानतो.’

विषारी सापाला भाजप मानतो…

विवाह समारंभात बोलताना उदयनिधी स्टॅलिन म्‍हणाले. की, “जर एखादा विषारी साप तुमच्या घरात शिरला तर त्याला फक्त फेकून देणं पुरेसे नाही. कारण तो तुमच्या घराजवळील कचऱ्यात लपून बसू शकतो. तुम्ही जाेपर्यंत झाडे साफ करत नाही तोपर्यंत साप तुमच्या घरी परत येतच राहील. याची तुलना सद्यस्थितीशी केली, तर मी तामिळनाडूला आमचं घर मानतो, विषारी सापाला भाजप मानतो आणि आमच्या घराजवळचा कचरा अण्‍णाद्रमुक पक्षाला मानतो. विषारी साप दूर करा. भाजपपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला अण्णाद्रमुकलाही संपवण्याची गरज आहे.”

 

Back to top button