Kerala Bypoll : चंडी घराण्याचा सलग १३वा विजय; काँग्रेसचे चंडी ओमन यांचा मोठा विजय | पुढारी

Kerala Bypoll : चंडी घराण्याचा सलग १३वा विजय; काँग्रेसचे चंडी ओमन यांचा मोठा विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळ येथील पुथुपल्ली मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस नेते चंडी ओमान यांनी मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट विरुद्ध डावी आघाडी ही निवडणूक झाली. डाव्या आघाडीचे उमेदवार जॅक थॉमस यांच्या त्यांनी पराभव केला. तर एनडीएचे उमेदवार लिजिन लाल तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

चंडी ओमान यांना ८०,१४४ मते मिळाली तर थॉमस यांना ४२ हजार ४२५ मते मिळाली तर लाल यांना ६,५५४ इतकी मते मिळाली आहेत.
चंडी ओमान यांचे वडील माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी ही निवडणूक झाली. माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी या मतदारसंघातून १२ वेळा विजय मिळवला होता.

विजयानंतर चंडी ओमन म्हणाले, “या मतदारसंघाने गेली ५३ वर्षं आमच्यावर विश्वास ठेवला आहे. वडिलांवर प्रेम करणाऱ्या मतदारांनी मलाही तितकेच प्रेम दिले आहे. या मतदारसंघाने विकासासाठी दिलेले हे मत आहे.”

हेही वाचा

Back to top button