राहुल गांधी लालूंकडून शिकले चंपारण्य मटणाची रेसिपी

राहुल गांधी लालूंकडून शिकले चंपारण्य मटणाची रेसिपी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राजद प्रमुख लालू प्रसाद यांच्याकडून बिहारमधील प्रसिद्ध चंपारण मटण कसे करायचे हे शिकून घेतले. त्याचा व्हिडीओ यूट्युबवर शेअर करण्यात आला आहे. 'लालूजी यांची विशेष रेसिपी आणि राजकीय मसाला', असे कॅप्शन राहुल गांधी यांनी व्हिडीओला दिले आहे. लालू प्रसाद यादव हे लोकप्रिय राजकीय नेते आहेत, हे सर्वांना माहीत आहे. मात्र, त्यांच्यात एक लपलेली कला आहे ती म्हणजे, ते एक उत्तम स्वयंपाकी आहेत. त्यांच्या प्रकृतीत चांगला फरक पडल्यानंतर त्यांच्याकडून उत्तम स्वयंपाक शिकण्याचा माझ्या मनात विचार आला, असे राहुल गांधी व्हिडीओत म्हणत आहेत.

लालू प्रसाद यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांची मोठी बहीण मीसा भारती उपस्थित होत्या. यावेळी राहुल गांधी यांनी लालू यांना तुमचा आवडता खाद्यपदार्थ कोणता, असा प्रश्न विचारला. यावर लालू म्हणाले की, थाई फूड! यावर राहुल गांधी म्हणाले की, माझी बहीण प्रियांका थाई फूड चांगले बनवते. मी तुम्हाला ते नक्कीच पाठवेन.

भाजपकडून देशात सातत्याने द्वेषाचे राजकारण केले जाते, याचे कारण काय असावे, असा प्रश्न राहुल गांधी यांनी लालू यांना विचारला. यावर लालू म्हणाले, भाजपची राजकीय भूक काही मिटताना दिसत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news