चंद्रावरील भूकंपाची ‘विक्रम’कडून नोंद | पुढारी

चंद्रावरील भूकंपाची ‘विक्रम’कडून नोंद

बंगळूर, वृत्तसंस्था : चांद्रयान-3 चा चंद्रावर उतरल्यानंतरच्या नवव्या दिवसाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावरून भूकंपाची नोंद घेण्यात विक्रम लँडरला यश मिळाले आहे. विक्रम लँडरवर बसवलेल्या इन्स्ट्रुमेंट ऑफ लुनार सिस्मिक अ‍ॅक्टिव्हिटी (इल्सा) या पेलोडने 26 ऑगस्ट रोजी झालेल्या भूकंपाची नोंद घेतली. भूकंपाच्या केंद्रबिंदूचा शोध सुरू असल्याचे वक्तव्य ‘इस्रो’कडून शुक्रवारी जारी करण्यात आले.

मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टीमवर आधारलेल्या इल्सा पेलोड चंद्राच्या पृष्ठभागावर पहिल्यांदाच पाठवण्यात आलेले होते. भूकंपाच्या धक्क्याने रोव्हर आणि इतर पेलोडच्या हालचालींच्या माध्यमातून चंद्रावरील कंपनांची नोंद घेतली गेली.

चंद्रावर प्लाझ्मा; पण विरळ

विक्रम लँडरवर बसवलेल्या रेडिओ अ‍ॅनाटॉमी अतिसंवेदनशील लोनोस्फियर आणि अ‍ॅटमॉस्फियर-लँगमुइर प्रोब (रम्भा) या पेलोडने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्लाझ्मा शोधून काढला आहे; पण तो विरळ आहे. मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर असल्याची दुसर्‍यांदा पुष्टी झाली आहे.

Back to top button